MPSC-UPSC परीक्षांच्या चक्रात मुलं-मुली अडकून बेरोजगारीकडे कसे ढकलले जातात?

MPSC-UPSC परीक्षांच्या चक्रात मुलं-मुली अडकून बेरोजगारीकडे कसे ढकलले जातात?
Published

दरवर्षी लाखो मुलं आणि मुली MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी अनेकांची सुरुवातीची एक-दोन वर्षं ही परीक्षा काय आहे, हे समजण्यातच जातात.

मग असं करत आयुष्यातली 4-5-6-7-8-9 आणि 10 वर्षं फक्त या परीक्षांचा अभ्यास करण्यातच जातात. मग ते या परीक्षांच्या चक्रात कसे अडकतात, हे त्यांच्याही लक्षात येत नाही.

जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्हा बाहेरच्या जॉब मार्केटमध्ये त्यांना नोकरी मिळणं खूप कठीण होऊन जातं. याविषयी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.

रिपोर्ट - गणेश पोळ