You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 18 जखमी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 18 जखमी
Published
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी रात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार तर 18 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल 97 जवळची घडली. जखमींना वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नवरात्रोत्सवासाठी शेगाववरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जात असताना धामणगाव जवळ चॅनल 97 वर हा अपघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निकेतन कदम, धामणगाव नगराध्यक्ष अर्चना रोठे रुग्णालयात दाखल झाल्या. अपघाताच्या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन