शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाची महिला डॉक्टरला मारहाण? नेमकं प्रकरण काय?
शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाची महिला डॉक्टरला मारहाण? नेमकं प्रकरण काय?
Published
डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून एक महिला डॉक्टर, एक अन्य डॉक्टर तसंच तीन महिला नर्सना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या CCTV फुटेजमध्ये पांढरा शर्ट घालून रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर आरोप आहे.
यानंतर रमेश म्हात्रे यांनी एक पत्रकार परिषद घेत मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण आपल्यावरचे आरोप फेटाळले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






