कलाकारांवर तब्बल दीड तास पोत्याने पैशांचा वर्षाव, अनेक वर्षांपासूनची 'ही' परंपरा काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कलाकारांवर पोत्याने पैशांचा वर्षाव, लोक डायरोची परंपरा काय आहे?
कलाकारांवर तब्बल दीड तास पोत्याने पैशांचा वर्षाव, अनेक वर्षांपासूनची 'ही' परंपरा काय आहे?
Published

कार्यक्रमादरम्यान कलाकारांवर पोत्याने पैशांचा वर्षाव केला जात आहे. ही दृश्यं आहेत गुजरातच्या जुनागढमधली.

गुजरातमध्ये लोक डायरो कार्यक्रमांचं आयोजन करण्याची परंपरा आहे. श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञानिमित्त अशाच एका लोक डायरोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी तब्बल दीड तास पैशांचा वर्षाव झाल्याचं आयोजकांनी सांगितलं.

या लोक डायरोमध्ये जिग्नेश कविराज, गोपाल साधू यांसारखे कलाकार सहभागी झाले होते. प्रेक्षकांनी त्यांच्यावर पोत्याने पैसे उधळले.

प्रसिद्ध लोकगायक मायाभाई आहीर हे देखील कलाकारांवर रुपये उधळताना दिसले.

सौराष्ट्रात लोक डायरोमध्ये अशा प्रकारे रुपयांची उधळण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते.

लोक डायरामध्ये देणगी स्वरूपात जमा झालेले हे पैसे समाजोपयोगी आणि सेवाभावी कामांसाठी वापरले जातात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)