तुकाराम मुंढेंमुळे चर्चेत आलेल्या नागपूरच्या 'सावजी रेसिपी'चा असा आहे इतिहास
तुकाराम मुंढेंमुळे चर्चेत आलेल्या नागपूरच्या 'सावजी रेसिपी'चा असा आहे इतिहास
Published
नागपूर म्हटलं की सावजी मटण आणि चिकन आठवतं. पण अस्सल सावजी म्हणजे नेमकं काय? त्याची खासियत फक्त तिखटपणा आणि तेलकटपणात आहे का?
आम्ही सावजीच्या पारंपरिक रेसिपीचा आणि तिच्या इतिहासाचा शोध घेतला. विदर्भातील हलबा समाजातील कुटुंबांकडून सावजी मसाला आणि भाजी बनवण्याची पारंपरिक पद्धत समजून घेतली.
सावजी नाव कसं पडलं, घरगुती जेवणाचं रूपांतर व्यवसायात कसं झालं आणि आज ‘सावजी’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होतेय का, याचाही मागोवा घेतला.
अस्सल सावजी ओळखायची कशी? त्याचा खास मसाला, पातळ काळसर रस्सा आणि चवीमागची परंपरा काय आहे?
- रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
- शूट- मनोज आगलावे
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर



