10 हजार रुपयांचा पगार न मिळाल्यानं कापड मार्केट पेटवून दिलं, 24 कोटी रुपयांचा माल जळून खाक

फोटो स्रोत, Rupesh Sonwane
सुरतमधील कापड बाजारात 9 सप्टेंबरच्या रात्री इतकी मोठी आग लागली, जी विझवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे 14 तास लागले.
या आगीत सुमारे 24 कोटी रुपयांच्या मालाचं नुकसान झालं.
खरंतर, सुरुवातीला हा एक अपघात असल्याचं मानलं जात होतं. परंतु, नंतर तपासाअंती ही आग नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद सावळे नावाच्या व्यक्तीनं ही आग लावली.
पगार न दिल्याने त्याचे मालकाशी वाद झाले होते. या वादानंतर त्याने मालक श्याम संगी यांच्या कापड बाजाराला आग लावली.
आग लावल्यानंतर आरोपी विनोद सावळे हा राजस्थान आणि उत्तर प्रदेशात फरार झाला. पण अखेरीस पोलिसांनी त्याला अटक केली.
नेमकं काय प्रकरण आहे?
सुरतमध्ये, 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर (9 सप्टेंबरच्या पहाटे), कुंभरिया थ्री क्रॉसिंगजवळील श्याम संगी यांच्या टेक्सटाईल मार्केटच्या सहाव्या मजल्यावर आग लागली.
सुरतच्या कापड बाजारात वारंवार आगी लागतात. कारण, बाजारात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील असं कापड असतं. तसेच, अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायकपणे लटकलेल्या असतात.
श्याम संगी यांच्या कापड बाजारातील आग सुरुवातीला नैसर्गिक कारणांमुळे लागली असावी असं मानलं जात होतं. परंतु, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर असं दिसून आलं की, एका व्यक्तीनं कापडाच्या गठ्ठ्यावर ज्वलनशील द्रव पदार्थ ओतला आणि मग त्याला आग लावली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून, विनोद पंडित सावळे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद सावळे हा हनुमान प्रसाद यांच्यासाठी या बाजारातील जगदंबा टेक्सटाइल्सच्या दुकान क्रमांक 639 मध्ये 30 हजार रुपये मासिक पगारावर अकाऊटंट म्हणून काम करत होता.
नोकरी सोडल्यानंतर त्याचं व्यापाऱ्यासोबत भांडण झालं. व्यापाऱ्यानं उर्वरित 10 हजार रुपये देण्यास नकार दिला. व्यापाऱ्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून त्यानं आग लावली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

फोटो स्रोत, PTI
आरोपी विनोद सावळेनं दुकान बंद होण्याची वाट पाहिली आणि मध्यरात्री 12 वाजता आग लावली.
सुरतचे अतिरिक्त डीसीपी (गुन्हे) करणराज वाघेला यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "नोकरी सोडल्यानंतर थकीत असलेल्या 10 हजार रुपयांच्या रकमेवरून मालकाला धडा शिकवण्यासाठी विनोद पंडित सावळे नावाच्या आरोपीनं ही आग लावली."
ते म्हणाले की, "आरोपीनं दिंडोलीतील एका पेट्रोल पंपावरून 150 रुपयांचं पेट्रोल विकत घेतलं आणि दुकानाबाहेर ठेवलेल्या कापडी पार्सलवर पेट्रोल शिंपडून त्याला काडेपेटीनं आग लावली होती. त्यानंतर आरोपी राजस्थानातील खाटूश्याम मंदिर आणि उत्तर प्रदेशमधील अयोध्येतही फरार झाला. अखेरीस, सुरतला परत येत असताना दिंडोली फ्लॉवर गार्डनजवळ आरोपीला पकडण्यात आलं."
पोलिसांनी असंही सांगितलं की, "घटनेच्या दिवशी, आरोपी रात्री नऊ वाजता कापड बाजारात गेला होता आणि दुकान बंद होण्याची वाट पाहत पाचव्या मजल्यावर बसला होता."
जेव्हा दुकान बंद करून मालक बाहेर पडला, तेव्हा आरोपीनं मध्यरात्री 12 नंतर दुकानाला आग लावली. दुसऱ्या दिवशी, जेव्हा आरोपीचं नाव उघड झालं, तेव्हा त्यानं आपला मोबाईल फोन बंद केला आणि तो फरार झाला.
आग लागल्याच्या दुसऱ्या दिवशी, सुरत महानगरपालिकेचे उपआयुक्त धर्मेश मिस्त्री यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "अग्निशमन दलाला रात्री 12 वाजून 50 मिनिटांनी फोन आला. आग सर्वात वरच्या मजल्यावर लागली होती."

फोटो स्रोत, CCTV
दुकान बंद होण्याची वाट पाहिली आणि मध्यरात्री रात्री लावली आग

सगळ्या अग्निशमन केंद्रांमधून बोलावण्यात आली वाहनं
आग विझवण्यासाठी 14 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे त्या मजल्यावरील सर्व दुकानं जळून खाक झाली. याव्यतिरिक्त, खालच्या पाचव्या मजल्यावरील काही दुकानांमधील मालदेखील जळून खाक झाला.
घटनेच्या तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला रुमाल बांधलेला एक माणूस कापडी पार्सलवर काहीतरी फवारून त्याला आग लावताना दिसला. याच्या आधारे, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला. नंतर आरोपी विनोद सावळेची ओळख पटवण्यात आली.

फोटो स्रोत, ANI Video Grab
मालक वारंवार ओरडायचा म्हणून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद सावळे ज्या व्यापाऱ्याकडे काम करत होता, तो त्याच्या प्रत्येक बोलण्यात चुका काढायचा आणि त्याला शिव्या द्यायचा. त्यामुळे त्यानं महिन्याभरापूर्वी नोकरी सोडली. पण त्याचा 10 हजार रुपयांचा पगार मिळणं बाकी होतं. आपले पैसे मिळवण्यासाठी त्यानं व्यापाऱ्याला वारंवार फोन केला आणि प्रत्यक्ष भेटलाही, पण व्यापाऱ्यानं त्याला टाळलं. त्यामुळे व्यापाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्यानं दुकानाबाहेर ठेवलेले कापडाचे गठ्ठे जाळले.
अतिरिक्त डीसीपी (गुन्हे) करणराज वाघेला म्हणाले की, "माल जाळून टाकल्यानंतर विनोद सावळे घटनास्थळावरून आपल्या मोटरसायकलवरून फरार झाला."
आपल्या गावी जाण्याऐवजी तो राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अयोध्येत गेला आणि रविवारी रात्री सुरतला परतला. त्यावेळी पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला दिंडोली परिसरातून पकडण्यात आलं.
या प्रकरणात आरोपी विनोद पंडित सावळे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)