You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तैवानने भारताला मागे टाकलं, सर्वात मोठं कारण काय?
तैवाननं सोमवारी (25 मे) स्टॉक मार्केट व्हॅल्यूएशन म्हणजे शेअर बाजाराच्या एकूण बाजार मूल्याच्या बाबतीत भारताला मागे टाकलं. म्हणजेच, तैवानच्या शेअर बाजाराचं एकूण मूल्य भारताच्या शेअर बाजारापेक्षा जास्त झालं आहे.
यामागचं सर्वात मोठं कारण ठरलं, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) या सर्वात मोठ्या चिप निर्मिती कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेली तुफान वाढ.
अर्थात, स्टॉक मार्केट व्हॅल्यूएशन म्हणजे शेअर बाजाराच्या एकूण बाजार मूल्याच्या बाबतीत जरी तैवाननं भारताला मागे टाकलं असलं, तरीदेखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था सध्या 4.15 ट्रिलियन डॉलरची (अंदाजे 397 ट्रिलियन रुपये) आहे.
तर तैवानची अर्थव्यवस्था 977 अब्ज डॉलरची (अंदाजे 93,47,936 कोटी रुपये) आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था तैवानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा बरीच मोठी आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)