You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटनेबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?
काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झालेल्या मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंकवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना 6 जुलैला घडली.
स्लॅब कोसळून माती आणि पाण्याचा लोंढा थेट मिसिंग लिंकच्या रस्त्यावर आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
रस्ता खुला करण्यासाठी प्रशासन धावलं असलं तरी विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. अनेक प्रश्न उपस्थित झाले.
या राजकारणापलीकडे जात नेमकं काय घडलं असावं, एवढी मोठी दुर्घटना कशामुळे घडली असावी, त्याची जबाबदारी कोणाची या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.
श्रीखंडे कन्सल्टन्सी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव श्रीखंडे यांच्या मुलाखतीतून आपण हे समजून घेऊ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)