जास्त तापमानाची झळ सर्वाधिक कोणाला बसते? एका इस्त्रीवाल्याची गोष्ट

जास्त तापमानाची झळ सर्वाधिक कोणाला बसते? एका इस्त्रीवाल्याची गोष्ट
Published

43°C च्या प्रचंड उकाड्यात आपण शक्यतो घराबाहेर पडणं टाळतो. पण काही लोकांसाठी काम थांबवणं हा पर्यायच नसतो. छत्रपती संभाजीनगरमधील नंदू चंद्रभान शिंदे गेली 40 वर्षे इस्त्रीचा व्यवसाय करत आहेत. 10x10 च्या छोट्याशा दुकानात ते रोज 11 ते 12 तास गरम इस्त्रीसमोर उभे राहून काम करतात. बाहेरचं तापमान 43°C च्या पुढे गेलं असताना दुकानातील उकाडा, गरम फॅनची हवा, घाम आणि वीजपुरवठ्याच्या समस्या यांचा सामना करत त्यांचा दिवस कसा जातो?

या ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहा, वाढत्या उष्णतेचा असंघटित क्षेत्रातील कामगारांवर नेमका काय परिणाम होतो आणि पोटासाठी त्यांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)