अयोध्या राम मंदिरात देणग्यांची चोरी कशी झाली? BBC चा विशेष तपास
अयोध्या राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या दान-देणग्यांच्या रकमेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बीबीसीच्या तपासात राम मंदिरात काम केलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.
मंदिराचे माजी कर्मचारी महिपाल सिंह यांनी दावा केला आहे की 2022 मध्ये त्यांना 5 लाख रुपयांचा फरक आढळल्यावर त्यांनी चोरी उघडकीस केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने SIT स्थापन केली असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. CCTV तपासणीत 70 वेळा पैसे चोरीला गेल्याचे स्पष्ट झालं असून, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
पाहा बीबीसीच्या तपासात कोणते नवीन प्रश्न उपस्थित होतायत
रिपोर्ट – राघवेंद्र राव
अतिरिक्त रिपोर्टिंग – गौरव गुलमोहर
ग्राफिक्स: वासिफ खान आणि पुनीत बरनाला
शूट आणि एडिट – प्रभात कुमार
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






