BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
तुमच्या जोडीदाराचं घोरणं तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतंय का?
जोडीदाराच्या घोरण्यामुळे रात्री नीट झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तणाव, थकवा किंवा विसरभोळेपणा जाणवतो का? याचा जोडीदाराच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय करता येईल, हे जाणून घेऊया.
BRICS परिषदेत मोठी घोषणा; 'नवी दिल्ली जाहीरनाम्या'वर सर्व सदस्य देशांचे एकमत
याआधी भारताने 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्सची अध्यक्षता आणि परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी सांभाळली होती.
व्हीडिओ, पुणे येथे DJ ला विरोध केला म्हणून सोसायटीमध्ये असा झाला त्रास, वेळ 4,45
सोसायटी मध्ये सण उत्सवांना लावल्या जाणाऱ्या साउंड सिस्टम मुळे त्रास आणखी वाढत असल्याचं त्या सांगतात. पाहा हा रिपोर्ट.
थायलंडमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; बौद्ध भिक्खूच्या घरातून सोनं आणि रोकड जप्त, महिलेसोबतचा व्हीडिओही समोर
अटकेनंतर या भिक्कूला भिक्कू पदावरून हटवण्यात आलं आहे. या प्रकरणावर त्याने अद्याप सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराकमधून ड्रोन हल्ला, सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन केली बंद
इराकमधून ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन बंद केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आता आणखी वाढल्याचे दिसत आहे.
मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
'माधुरी' हत्तीण नांदणी मठात परतली, उच्चाधिकार समितीनं परवानगी देताना कोणत्या अटी घातल्या?
कोल्हापुरातील नांदणी येथील माधुरी हत्तीण अखेर शुक्रवारी रात्री परतली आहे. याठिकाणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात लाडक्या माधुरीचं स्वागत केलं आहे.
अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला खरंच डोनाल्ड ट्रम्प 5000 डॉलर देणार का?
महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेची चर्चा अजूनही सुरू असतानाच, अमेरिकेतही करदात्यांना दिलासा देणाऱ्या एका प्रस्तावाची चर्चा रंगली आहे. मात्र हा प्रस्ताव प्रत्यक्षात कायदा बनेल का, याबाबत अर्थतज्ज्ञ साशंक आहेत. काँग्रेसकडून अशा प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता किती, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
'आवाजाच्या भीतीनं वडिलांना गावी नेलं, तिथं उपचाराअभावी मृत्यू झाला'; पुण्यात लाऊडस्पीकरच्या आवाजाचा मुद्दा ऐरणीवर
पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी केल्यानंतर आता अनेक जण पुढे येत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती देत आहेत.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































