'तुम्ही तरुण असताना अपशब्द वापरले होते की नाही', GenZ च्या भाषेसंदर्भात गणेश देवींची परखड मुलाखत

'तुम्ही तरुण असताना अपशब्द वापरले होते की नाही', GenZ च्या भाषेसंदर्भात गणेश देवींची परखड मुलाखत
Published

प्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि भाषा तज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना तरुण पिढी म्हणजेच 'GenZ'च्या भाषाशैलीवर आणि अभिव्यक्तीवर प्रकाश टाकला आहे.

दर 15 ते 20 वर्षांनी नवी पिढी स्वतःचे नवीन शब्द आणि संवादाची नवी ढब तयार करते, ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीत कोड स्विचिंग, नेटवर्क कम्युनिटी, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा भाषेवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

याशिवाय शिक्षण पद्धतीतील त्रुटी, खेळाच्या मैदानांची कमतरता, रोजगाराचे प्रश्न, निर्णय प्रक्रियेतील मानवी कौशल्याचे महत्त्व आणि संविधानात्मक मूल्यांचे रक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रा. गणेश देवी यांनी भाष्य केले आहे.

मुलाखत - प्राची प्रतिभा शिरीष

शूट - नितीन नगरकर