जगातील पहिल्या सुपरमॉडेल्सपैकी एक असलेल्या वेरुश्का यांचं निधन; पाहा त्यांचे 8 गाजलेले फोटो

Caption- 1960 आणि 70 च्या दशकामध्ये वेरुश्का यांची छायाचित्रं 'व्होग' आणि 'लाईफ' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकत होती.
फोटो कॅप्शन, 1960 आणि 70 च्या दशकामध्ये वेरुश्का यांची छायाचित्रं 'व्होग' आणि 'लाईफ' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकत होती.
    • Author, इयान यंग्स
    • Role, सांस्कृतिक प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

1960 च्या दशकात फॅशनविश्वातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टारपैकी एक बनलेल्या मॉडेल आणि कलाकार वेरुश्का यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं.

त्यांचे अनेक कल्पक आणि वेगळ्या पद्धतीने केलेले फोटोशूट्स गाजले. या फोटोशूट्समुळे 1960 आणि 70 च्या दशकात फॅशन आणि सौंदर्याच्या कल्पनांना नवीन दिशा मिळाली, त्यांच्या सीमा विस्तारण्यास मदत झाली. वेरुश्का अमेरिकेतील 'व्होग' मासिकाच्या मुखपृष्ठावर तब्बल 13 वेळा झळकल्या होत्या.

'व्होग' मासिकाने श्रद्धांजली वाहताना वेरुश्का यांचा उल्लेख "एका संपूर्ण युगावर ठसा उमटवणारी सुपरमॉडेल" असा केला.

"पहिल्या सुपरमॉडेलपैकी एक असलेल्या वेरुश्का यांनी फॅशनविश्वात परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हणूनही मोठं नाव कमावलं होतं."

त्यांनी 1960 च्या दशकात गाजलेला स्विंग चित्रपट 'ब्लो अप' आणि 2006 मध्ये आलेल्या जेम्स बाँडच्या 'कॅसिनो रॉयल' या चित्रपटातही काम केलं होतं.

वेरुश्का गवतावर पडून एका बाजूला पाहत आहे, तिचा हात तिच्या कपाळावर आहे; त्याच वेळी जवळच एक पुरुष छायाचित्रकार पडून छायाचित्र काढत आहे.
वेरुश्काचा केवळ चेहरा दिसतोय आणि ती वेणी घातलेल्या केसांच्या विळख्यात वेढलेली आहे.

वेरुश्का (व्हेरा वॉन लेन्डॉर्फ) यांचा जन्म 1939 मध्ये कोनिग्सबर्ग येथील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यावेळी हे शहर जर्मनीत होतं. आता हे शहर रशियातील कॅलिनिनग्राड या नावाने ओळखलं जातं.

त्यांचे वडील काउंट हेनरिक वॉन लेन्डॉर्फ यांना ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 1944 मध्ये फाशी देण्यात आली होती. हा कट यशस्वी झाला नव्हता.

वेरुश्का एका पांढऱ्या घुमटावर बसलेली आहे. तिचे पाय उघडे आहेत आणि तिच्या शरीराच्या वरच्या भागावर पिवळ्या-काळ्या रंगाचा, नक्षीदार लांब स्कार्फ पसरलेला आहे. हा स्कार्फ छायाचित्राच्या अग्रभागापर्यंत (फोअरग्राउंडपर्यंत) विस्तारलेला दिसतो.
वेरुश्काचे डोके आणि खांदे; तिचा चेहरा भावहीन असून ती थेट समोर पाहत आहे आणि हे सर्व एका पारदर्शक, लंबवर्तुळाकार, रत्ने जडवलेल्या चौकटीत बंदिस्त आहे.

त्यांनी हॅम्बर्ग आणि फ्लॉरेन्स येथे कलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली आणि लवकरच त्या एक दिग्गज मॉडेल बनल्या, असं त्यांची बहीण काउंटेस कॅथरिना वॉन लेन्डॉर्फ यांनी लिहिलं आहे.

त्यांनी इव्ह सेंट लॉरेंट, कार्ल लेगरफेल्ड आणि व्हॅलेंटिनो यांसारख्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससोबत काम केलं.

याशिवाय, वेगळ्या धाटणीच्या फोटोशूटमध्येही त्या सहभागी झाल्या. या फोटोशूटमध्ये त्या स्वतःच्या शरीरावर चित्रं काढायच्या, वेगवेगळे प्रयोग करायच्या आणि शरीराचा वापर करून नवनवीन कलाकृती साकारायच्या.

"वेरुश्का केवळ मॉडेल नव्हत्या, तर त्या एक कलाकार आणि बंडखोर वृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या कलाकृतींना स्त्रीवादी विचारांवर आधारित परफॉर्मन्स कलेची सुरुवात मानलं जातं."

वेरुश्काच्या शरीराभोवती आणि डोक्याभोवती तपकिरी फरचे अस्तर असलेली एक मोठी पांढरी चादर घट्ट गुंडाळलेली होती. त्यातून फक्त तिचा चेहरा दिसत होता.
वरुश्का एका गडद पिवळ्या शिफॉन ड्रेसमध्ये
Caption- बर्लिन फॅशन वीक फॉल/विंटर 2012 या शोमध्ये अंजा गॉकेल यांच्या डिझाइनचे कपडे परिधान करून रॅम्पवर चालताना वेरुश्का.
फोटो कॅप्शन, बर्लिन फॅशन वीक फॉल/विंटर 2012 या शोमध्ये अंजा गॉकेल यांच्या डिझाइनचे कपडे परिधान करून रॅम्पवर चालताना वेरुश्का.