You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट
पूर, भूकंप किंवा एखादी मोठी दुर्घटना... आपत्तीच्या वेळी जीव वाचवण्यासाठी धैर्य, कौशल्य आणि प्रशिक्षणाची गरज असते.
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
पण हे केवळ एका प्रशिक्षणापुरतं मर्यादित नाही.
भारतामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना समान हक्क आणि संधी देण्यासाठी कायदा आणि धोरणं अस्तित्वात आहेत. कोल्हापुरातील हा उपक्रम त्या समान संधीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा एक प्रयोग आहे.
ज्यांना समाज अनेकदा साच्यातल्या भूमिकांमध्ये पाहतो, तेच आता आपत्तीच्या वेळी इतरांचे जीव वाचवण्यासाठी सज्ज होत आहेत.
- रिपोर्ट आणि शूट- शाहीद शेख
- व्हीडिओ एडिट- शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)