You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्ही पण 80s मधला फोटो बनवून पोस्ट केला का? पण हे खरंच किती सेफ आहे?
तुमच्याही टाईमलाईनवर लोकांचे '80s called' आणि '80s का दौर कुछ और ही था' अशा कॅप्शनचे फोटोज आलेच असतील. अगदी आपले नेतेमंडळीही यात मागे नाहीत.
मग I am sure तुम्हीही हा ट्रेंड फॉलो केलाच असेल.
एकदम 80s मधल्या हिरो-हिरोईन्ससारखी हेअरस्टाइल, ड्रेसेस, गॉगल्स आणि हो, हाय-रेज जीन्स... अशा लूक्समध्ये आपण कसे दिसलो असतो हे पाहायला प्रत्येकच जण उत्सुक आहे. ChatGPT ला एक प्रॉम्प्ट दिला आणि 1 मिनिटात तुमचा लूक रेडी.
पण ChatGPT किंवा कुठल्याही AI ऍपला तुमचे फोटो देणं आणि हे असं करणं, खरंच किती सेफ आहे, याचा विचार केलाय का?
आपण AI ला जो फोटो देतोय, आपली माहिती देतोय, ती AI ला ट्रेन करण्यासाठी वापरली जातेय. म्हणजे एक प्रकारे हे मॉडेल्स आपणच दिलेल्या माहिती आणि फोटोंवरून नवीन गोष्टी शिकत आहेत.
दुसरं म्हणजे, यापैकी काही कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये असं असू शकतं की तुमचा फोटो कधीच डिलीट केला जात नाही. अशात आपल्या फोटोचा, डेटाचा गैरवापर होणं किंवा डेटा चोरीला जाण्याची भीती असतेच.
तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वीचा तो घिबली ट्रेंडही असाच होता.
इंटरनेट मॅटर्स या संस्थेच्या मते, अशा AI ट्रेंडमधले धोके आपल्याला आज नाही दिसणार. पण भविष्यात आपल्यासारख्याच हुबेहूब काल्पनिक व्यक्तीचा फोटो किंवा व्हीडिओ दिसेल आणि त्यावर आपलं नियंत्रण राहणार नाही, तेव्हा हा धोका लक्षात येईल.
मग AI चे असले trends फॉलो करायचेच असतील तर इंटरनेट मॅटर्सची ही safety checklist तुमच्यासाठीच
त्यामुळे तुमचा फोटो कायमस्वरूपी ऑनलाईन राहणं तर तुम्हाला चालणार आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारा.
ज्या लहान मुलांचा consentही नाहीये, त्यांचेही फोटो आपण AI ला देतोय. उद्या त्यांना ते नको असेल तर काय?
- तुम्ही जो फोटो AI ला देताय त्यात शाळेचा गणवेश, तुमचा पत्ता, शाळेचा पत्ता किंवा वैयक्तिक माहिती दिसत नाहीये ना, ते चेक करा.
- तुमच्या अकाउंटच्या Privacy सेटिंग्स चेक करा - training turned off आहे ना, ते पाहा.
पटतंय तर काळजी घ्या, आणि ही माहिती इतरांसोबत शेअर करा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन