मराठी सक्तीला एका वर्षासाठी ब्रेक; या निर्णयाने फडणवीसांनी शिंदे आणि सरनाईकांना शह दिलाय का?

मराठी सक्तीला एका वर्षासाठी ब्रेक; या निर्णयाने फडणवीसांनी शिंदे आणि सरनाईकांना शह दिलाय का?
Published

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी भाषा यायलाच हवी या यासाठी अक्शनमोडवर असणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावला आहे.

मागील आठवड्यात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मुख्यमंत्र्यांना मिळाल्याचा निर्णय झाला होता, त्याचंच प्रात्यक्षिक मराठी सक्ती वरून पाहायला मिळत आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी भाषा यायलाच हवी या यासाठी अक्शनमोडवर असणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावाला आहे. तोही थेट एक वर्षासाठी.

20 ऑगस्ट पासून व्यवहारिक मराठी बंधनकारक करत कारवाई मोहीम प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेली.

पण आता मुख्यमंत्र्यांनी थेट एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि थेट शिंदेंना राजकीय शह दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर विरोधकांनी देखील सरकारची अंतर्गत बाराखडी चुकते अशी टीका केलीय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन