You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोलापूरच्या हनुमंत जाधवने U17 जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं कांस्यपदक
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदज गावचा हनुमंत जाधव याने U17 जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. हनुमंतचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात.
त्याचे आजोबा कुस्तीप्रेमी असल्याने त्यांनीच त्याला लहानपणापासून कुस्तीची गोडी लावली. पुढे त्याला माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील तालिमीत प्रशिक्षणासाठी दाखल करण्यात आलं.
हनुमंतच्या या यशाचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र, पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाचा आणि स्पर्धांचा खर्च वाढणार असल्याने सरकारने त्याच्या कारकिर्दीसाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा त्याची आई चिमाबाई जाधव यांनी व्यक्त केली.
रिपोर्ट, शूट, एडिट – गणेश पोळ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)