You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू, आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक 4 मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी (30 जुलै) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास कोसळली.
या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भिवंडी महानगरपालिका आणि एनडीआरएफने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे जवान , एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम रात्री 11.45 वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाली असून शोध मोहीम सुरू आहे.
"ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. नागरिकांना देखील बाहेर काढण्यात आले होते. मात्र काही लोक नजर चुकवून या इमारतीमध्ये पिलरचे काम करत होते. त्यातील काही मजूर आणि एका कुटुंबातील लोक या घटनेत अडकल्याचा अंदाज आहे. बचाव पथकांचे शोध कार्य सुरू आहे", अशी माहिती स्थानिक आमदार महेश चौगुले यांनी दिली.
भिवंडी इमारत दुर्घटनेतील 7 व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आणि सकाळी 9:30 पर्यंत आय.जी.एम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.
घटनेतील मृतांची नावे पुढीलप्रमाणे
- शमीम शेख, वय 32
- रंजीत सिंग, वय 45
- ओळख पटलेली नाही.
- मिराज रसूल शेख, वय 34
- संतोष कुमार पांडे, वय 42
- शमीम अन्सारी, वय 30
- ओळख पटलेली नाही.
8 आणि 9 वा मृतदेहदेखील ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)